कुटीर रूग्णालयातील कॉपरच्या पाईपची चोरी - Saptahik Sandesh

कुटीर रूग्णालयातील कॉपरच्या पाईपची चोरी

करमाळा / संदेश प्रतिनिधी

करमाळा : येथील कुटीर रूग्णालयातील ऑक्सिजन प्लँट पासून रूग्णालय पर्यंत जाणारा १८ फुट लांबीचा २७०० रूपये किंमती १ इंच जाडीचा कॉपरचा पाईप अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे. ही चोरी ११ ऑगस्टला उघडकीस आली आहे. या प्रकरणी कुटीर रूग्णालयाचे कनिष्ठ लिपिक सुहास सुरेश आगलावे यांनी फिर्याद दिली आहे. पोलीसांनी यात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!