'मांगी'परिसरात 'बिबट्या'चा थरार कायम - नागरिकांमध्ये प्रचंड घबराट.. - Saptahik Sandesh

‘मांगी’परिसरात ‘बिबट्या’चा थरार कायम – नागरिकांमध्ये प्रचंड घबराट..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : प्रविण अवचर

करमाळा : मांगी (ता.करमाळा) येथे पुन्हा एकदा बिबट्याने वासरावर हल्ला करून ठार केले आहे. हा बिबट्या गेल्या ४ ऑगस्टपासून याच परिसरात फिरत असून, काल (ता.२३) रात्री बिबट्याने मांगी येथील विनोद बागल यांच्या गोठ्यात बांधलेल्या गाईच्या वासरावर हल्ला करून ठार केले, हा बिबट्या दररोज वेगवेगळ्या ठिकाणी जनावरांवर हल्ला करत आहे.

गेल्या ४ ऑगस्टपासून आज (ता.२४) तब्बल वीस दिवसांपासून हा बिबट्या वन विभागाला चकवा देत असून, दररोज पाळीव प्राण्यांवरती हल्ले करीत आहे. यामुळे मांगी तसेच वडगाव द., वडगाव उ., पोथरे ,कामोने जातेगाव, या शिवारामध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण असून शेतकरी जीव मोठी धरून शेतीची कामे करत आहेत. शेतात काम करण्यासाठी महिला मजूर घाबरत आहेत, यामुळे या भागातील गावकऱ्यांकडून वनविभाग कर्मचाऱ्यांवरती संताप व्यक्त केला जात आहे, वारंवार पिंजरे लावूनही बिबट्या वनविभागाच्या हाती लागत नसून तो दररोज आपली जागा बदलत आहे. यामुळे या बिबट्याला लवकरात लवकर पकडून त्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे.

बिबट्याचे ठसे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!