करमाळ्यात मराठा मोर्चाला सुरुवात – हजारोंच्या संख्येने युवक एकत्र…

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनात झालेल्या हल्ल्याचा निषेध आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आज (ता.६) करमाळा शहरात सकल मराठा समाजाच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून या मोर्चाला सध्या पोथरेनाका येथे सुरुवात झाली आहे. याठिकाणी हजारो युवक एकत्र आलेले दिसून येत आहेत. याठिकाणी अनेक संघटना तसेच युवकांनी मोठ्या संख्येने पाठींबा दिलेला आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचाही मोठा बंदोबस्त उभा करण्यात आला आहे.
हा मोर्चा थोड्याच वेळात करमाळा शहरातील मुख्य रस्त्यावरुन छत्रपती चौकात जाणार असून पुढे तहसील कचेरीच्या दिशेने जाणार आहे. पोलिसांनी करमाळा शहरात प्रत्येक चौकात चोख बंदोबस्त ठेवला आहे.






 
                       
                      