वरकुटे येथे जमीनबांधाच्या वादातून तिघांकडून एकास बेदम मारहाण

करमाळा(दि.२२जुलै) : वरकुटे शिवारात जमिनीच्या बांधावरून झालेल्या वादातून चुलत भावाने कुटुंबीयांसह मिळून एकास मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी तिघांविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाल आहे.

या प्रकरणी गणेश अंकुश चव्हाण (वय 30, रा. वरकुटे, ता. करमाळा) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे, की 20 जुलै रोजी सकाळी 11 वाजता मी माझ्या शेतात काम करत असताना शेजारील शेतात चुलत भाऊ महादेव नारायण चव्हाण झेंडूच्या फुलांची लागवड करत होता. यावेळी मी त्यास “माझ्या शेताचा बांध का कोरला?” अशी विचारणा केली असता महादेव याने रागाच्या भरात शिवीगाळ करत, “हा बांध माझाच आहे, तुला काय करायचं ते कर,” असे सांगून लाथाबुक्यांनी मारहाण केली.

त्यानंतर महादेवने आपली पत्नी इंदुबाई व मुलगा परशुराम यांना बोलावून घेतले. त्या तिघांनी मिळून मला जबर मारहाण केली. महादेव चव्हाण याने तेथेच पडलेली लाकडी काठी उचलून माझ्या डाव्या कानावर जबर मारहाण केली. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.




