जागेच्या वादातून तिघांना मारहाण- झरे येथील प्रकार

करमाळा : झरे येथे जागेच्या झालेल्या वादावादीतून अखेर मारहाणीची घटना घडली. या मारहाणीत फिर्यादीसह त्यांची पत्नी व आई यांना देखील मारहाण झाल्याची नोंद झाली आहे.

यात सोमनाथ शेटीबा जाधव (रा. झरे) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले,की आमचे जागेत महादेव गुटाळ व लक्ष्मण गुटाळ यांनी बांधकाम केले. ते बांधकाम का काढत नाही, असे विचारले असता.

शनिवारी दि. 5 सप्टेंबर ला रात्री 8 वाजता लक्ष्मण गुटाळ , राहुल गुटाळ, अर्जुन गुटाळ तसेच प्रशांत चौधरी, विकास आम्रुळे, लक्ष्मण घाडगे, आण्णा चौधरी, मानोज चौधरी, गणेश चौधरी हे सर्वजण एकत्र आले. त्यांनी मला शिवीगाळ केली तसेच लाथाबुक्क्यांनी व लाकडाने मारहाण केली.

या मारहाणीत फिर्यादी सोमनाथ जाधव, त्यांची पत्नी रेणुका व आई यशोदा हे जखमी झाले. गावातील लोकांच्या हस्तक्षेपाने मारहाण थांबली. त्यानंतर फिर्यादीने करमाळा पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली.
या प्रकरणी करमाळा पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

