शेतातील बांधाच्या कारणावरून तिघांजणांना सातजणांकडून मारहाण

करमाळा/ संदेश प्रतिनिधी
करमाळा,ता. 21:मलवडी शिवारात शेतातील बांधाच्या कारणावरून तिघाजणांना सातजणांनी शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना 20 सप्टेंबर ला सकाळी सात वाजता घडली.
याबाबत वैभव बिबीषण कोळी (वय 30) यांनी करमाळा पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले की 20 सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजता माझे वडील वैरण आणण्यासाठी शेतात गेले असता, नागेश कोळी यांनी त्यांना अडवून बांधाच्या कारणावरून शिवीगाळ केली. त्यानंतर सकाळी 7 वाजता मी वडील त्यांना शिवीगाळ का केली म्हणून विचारण्यास गेलो असता नागेश बिबीषण कोळी, सूर्यकांत कोळी, माधुरी नागेश कोळी, दत्तात्रय कोळी, रमेश्वर कोळी, एश्वर्य कोळी व दुर्गा कोळी या सात जणांनी खोर्याच्या दांडक्यांने व काठीने मारहाण केली. यामध्ये मला गंभीर दुखापत झाली असून माझी आईसुद्धा या गोंधळात जखमी झाली आहे. या प्रकरणी या सात जणांविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.




