वरकटणे शाळेचे तीन विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी सन २०२३-२४ मध्ये आयोजित केलेल्या पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत वरकटणे शाळेचे तीन विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले. यामध्ये इयत्ता पाचवीतील

  1. वेदांत सचिन व्हटकर
  2. उदयसिंह कुमार मस्कर
  3. आदित्य नितीन व्हटकर

या तीन विद्यार्थ्यांनी यश मिळवून शाळेचे नाव उज्वल केले. यासाठी या विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक सचिन व्हटकर यांचे मार्गदर्शन मिळाले. शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंद, केंद्रप्रमुख व गटशिक्षणाधिकारी व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य,ग्रामस्थ यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!