जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तालुक्यातील ८ शाळांसाठी २४ लाख रुपयांचा निधी मंजूर

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा सोलापूर जिल्हा नियोजन मंडळ सदस्य महेश चिवटे यांच्या विकास निधीतून करमाळा तालुक्यातील आठ शाळांच्या शौचालय दुरुस्ती कंपाऊंड व सुशोभीकरणासाठी 24 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
करमाळा तालुक्यातील रायगाव, चिखलठाण, वाघाची वाडी, करंजे, रामवाडी, हिवरवाडी, मांगी, पोटेगाव या आठ गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांसाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे.
याविषयी अधिक माहिती देताना महेश चिवटे म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून करमाळा तालुक्याला जास्तीत जास्त निधी मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे जिल्हा परिषदला प्राथमिक शाळातील शौचालय अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून त्याची सुशोभीकरण गरजेचे असून यासाठी प्रत्येक शाळेला तीन लाख रुपये निधी दिला आहे
शाळांना शौचालय व सुशोभीकरणासाठी निधी गरज आहे या सर्व शाळांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले.


