केम बिट मधून टिळक मित्र मंडळाला करमाळा पोलीस स्टेशनकडून प्रथम क्रमांकाचे बक्षीस
केम(संजय जाधव): करमाळा पोलीस स्टेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या गणेशोत्सव २०२४ स्पर्धेत केम येथील टिळक चौक गणेश मंडाळाला केम बीट मध्ये प्रथम क्रंमाक मिळाला आहे.
या मंडळाने गणेशोत्सव काळामध्ये डिजे न वाजवता पारंपारिक वाद्यांसह मिरवणूक काढली तसेच सामजिक सलोखा राखत विविध सामाजिक उपक्रम राबविले या बद्दल या गणेश मंडळाला प्रथम क्रमांक देण्यात आला आहे.
हा पुरस्कार उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटिल व पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या वतीने मंडळाचा प्रशस्ती पत्र देऊन सन्मान करण्यात आला. याचा स्वीकार मंडळाचे मार्गदर्शक राहुल कोरे व धनजंय सोलापूरे,ओंकार सोलापूरे यांनी स्वीकारला. मिळालेल्या पुरस्काराबद्दल मंडळाचे केम परिसरातून कौतूक होत आहे. इतर गणेश मंडळांनी या़चा आदर्श घेण्यासारखा आहे असे मत माजी सरपंच अजित तळेकर केम यांनी यावेळी व्यक्त केले.