वांगी नं.१ येथे टीपरचा अपघात - सोपान शेंडगे यांचे निधन - Saptahik Sandesh

वांगी नं.१ येथे टीपरचा अपघात – सोपान शेंडगे यांचे निधन

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : वांगी नं. १ येथे काल (ता.८) रात्री अकरा वाजता टिपर मालक सोपान ज्ञानदेव शेंडगे (वय २७,रा.केत्तूर) यांचा टिपरचा अपघात होऊन त्यात निधन झाले आहे.

यात हकीकत अशी, की केत्तूर येथील सोपान शेंडगे हे त्यांचा टिपर घेऊन वांगी नं. १ गावातून रात्री अकरा वाजता जात असताना त्यांच्या टिपरची ट्रॉली अचानक वर झाली. त्यावेळी ट्रॉली एलटी व एचटी वीज वाहक तारेला अडकली व त्यात तारा तुटल्या.

त्यावेळी सदरचा टीपर व्हायबल होऊन गावातील वेशीला धडकला. त्यानंतर वेशीवरील सिमेंटचा अवजड भाग टीपरच्या केबीन वर पडला. त्यावेळी टीपरचे केबीन दबून सोपान ज्ञानदेव शेंडगे यांचे निधन झाले आहे. त्यांचे मागे आई – वडील, पत्नी, तीन लहान मुले व भाऊ असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!