जगाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी लहानवयातच मुलांना उत्तम इंग्रजी शिक्षण देणे गरजेचे : प्राचार्य जयप्रकाश बिले - Saptahik Sandesh

जगाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी लहानवयातच मुलांना उत्तम इंग्रजी शिक्षण देणे गरजेचे : प्राचार्य जयप्रकाश बिले

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : जगाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी लहानवयातच मुलांना उत्तम शिक्षण संस्काराची गरज असून, त्यासाठी भैरवनाथ प्रतिष्ठानच्यावतीने इंग्रजी माध्यम शिक्षणाची सोय करण्यात आली आहे, उत्तम सुशिक्षित पिढी घडविण्यासाठी कटीबद्ध असल्याचे भैरवनाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयप्रकाश बिले यांनी व्यक्त केले.

भैरवनाथ प्रतिष्ठान संचलित जयप्रकाश बिले पब्लिक स्कूल झरे येथे ग्रॅज्युएशन डे व पालकसभेचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान जयप्रकाश बिले प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक प्रदीप मोहिते हे उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना जयप्रकाश बिले सर म्हणाले की केजी,ज्युनिअर केजी,सिनियर केजी,असा तीन वर्षांचा इंग्रजी माध्यमाचा ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर इयत्ता पहिली मध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो परिपूर्ण शिक्षणासाठी भैरवनाथ प्रतिष्ठानच्या शाळेमध्ये प्रवेश घेऊन विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्वल करण्याचे आव्हान त्यांनी केले.

या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी दहा वाजता सरस्वती पूजनाने शाळेच्या भव्य दिव्य हॉलमध्ये झाली. या कार्यक्रमांमध्ये मुलांना बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राध्यापक प्रदीप मोहिते यांनी मुलांना स्पर्धेच्या युगात टिकून राहायचं असेल तर आतापासूनच स्पर्धा परीक्षेची सवय मुलांना लागली पाहिजे हे पटवून दिले. जयप्रकाश बिले सर यांच्या मार्गदर्शनाखाली भैरवनाथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून करमाळा तालुक्यामध्ये शिक्षणाची सोय उत्तम असून मुलांची भवितव्य उज्वल असल्याचे त्यांनी सांगितले.

प्राध्यापक प्रदीप मोहिते सर सेवानिवृत्त झाल्याबद्दल भैरवनाथ प्रतिष्ठानच्यावतीने संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य बिले सर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून गौरव करण्यात आला. या कार्यक्रमासाठी ज्योती मुथा व सारिका चेंडगे मॅडम यांनी मुलांना वैदिक मॅथ व स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी या संदर्भात मार्गदर्शन केले. तसेच संस्थेच्या संचालिका डॉ स्वाती बिले यांनी जयप्रकाश बिले पब्लिक स्कूल हे नेहमी मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रम शाळेमध्ये राबवते आणि त्याचा फायदा नक्कीच मुलांच्या भावी आयुष्या मध्ये होईल असे त्यांनी मत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव युवराज बिले उपस्थित होते. त्यांनी पाहुण्यांचे आभार मानले आणि कार्यक्रम संपला असे जाहीर केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नम्रता साळुंके यांनी केले व मुख्याध्यापक दादासाहेब खराडे आणि इतर शिक्षक वृंद यांनी खूप मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी पार पाडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!