मुलींनी परश्याची आर्ची बनण्यापेक्षा,जिजाऊं रमाई, सावित्रीबाई बना - Saptahik Sandesh

मुलींनी परश्याची आर्ची बनण्यापेक्षा,जिजाऊं रमाई, सावित्रीबाई बना

सध्या एकविसाव्या शतकाच्या बदलत्या काळानुसार सोशल मीडिया चे आती वापरामुळे नव तरुण मुलींची मानसिकता बदलत चाललेली आहे. जुन्या काळातील धाडसी आदर्श महिला माता रमाई , जिजाऊ, सावित्रीबाई फुले ,मदर तेरेसा, राणी लक्ष्मीबाई ,अहिल्याबाई, हिरकणी अशा रणरागिनींचा इतिहास विसरून हल्लीच्या मुली सोशल मीडियावरून फक्त वाह्यात अनावश्यक गोष्टी बघत असतात  व त्याचे अनुकरण करत असतात. त्यातच सैराट सारखे सिनेमे बघून मुलींच्या मनामध्ये आर्चीचा जास्ती पगडा बसत आहे. याचेच कारण आहे की आजकालच्या मुली ह्या वाचनाकडे न वळता जास्तीत जास्त सोशल मीडियाकडे वळत आहेत.

अनेक बातम्यांमधून आपण पाहतो आहे की सोशल मीडियाच्या आती वापरामुळे मुलींमध्ये विकृतीचे प्रमाण जास्त वाढलेले आहे .मुलींचे विचार पाश्चात्य संस्कृतीकडे वळत आहेत . काही तारुण्यात आलेल्या 15 / 16 वर्षाच्या मुली सुद्धा जन्मदात्या आई वडिलांचे उपकार विसरून प्रियकरा सोबत पळून जाऊन लग्न करत आहेत.
ज्या वयामध्ये मुलींची वैचारिक पातळी परिपक्व नसते अशा वयात या मुलींकडून या चुका घडताना .दिसत आहेत.
यातूनच आत्महत्या ,खुन घटस्फोट होऊन ऐन तारुण्यात मुलींचे आयुष्य बरबाद होत आहे. याचाच अर्थ आजकालच्या मुलींचे वाचनाकडे दुर्लक्ष होते आहे.

विशेष करून अल्लड वयातील मुलींकडे पालकांनीही याबाबतीत लक्ष द्यायला हवे. काय वाईट काय चांगले याचा समज पालकांनी मुलींना द्यायला हवा. आज जागतिक महिला दिनानिमित्त माझी सर्व माता माऊलींना मनापासून शुभेच्छा व एक कळकळीची विनंती आहे की इतिहासातील रणरागिनींच्या विचारांचा पगडा आपल्या मुलींवरती जास्तीत जास्त बसवण्याचा प्रयत्न करा . माझ्या मते ज्या मुली माता रमाई , सावित्रीबाई फुले, जिजाऊ राणी लक्ष्मीबाई, अहिल्यादेवी, हिरकणी, मदर तेरेसा, या रणरागिनींचे बलिदानाचा त्यागाचा इतिहास वाचतील. त्यांच्याकडून आयुष्यात “आर्ची ” सारख्या कधीच चुका होणार नाहीत.

कु.श्रेया प्रवीण अवचर, मांगी, ता.करमाळा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!