करमाळा-अहमदनगर रस्त्यावर पावसामुळे वाहतुकीस अडथळा – दोन तासांपेक्षा जास्त वाहतूक ठप्प..

करमाळा (दि. 27 सप्टेंबर) : सकाळपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे करमाळा शहराजवळील अहमदनगर रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली होती. खास करून लावंड वस्ती जवळ असलेल्या तलावाचे सांडव्याचे सांडपाणी रस्त्यावर येऊन वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता.

अतिवृष्टीमुळे पाण्याचा मोठा लोट रस्त्यावरून वाहत राहिला आणि करमाळा शहरापासून मांगीपर्यंत सुमारे पाच ते दहा किलोमीटरपर्यंत वाहनांची लांब रांगा लागल्या. वाहनचालकांना दोन ते अडीच तास वाहतूक सुरळीत होण्यासाठी प्रतीक्षा करावी लागली.

संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी तसेच सामाजिक कार्यकर्ते युवकांनी या परिस्थितीवर तातडीने लक्ष देत जेसीबीव्दारे पाण्याचे निचरा सुरू केला, ज्यामुळे दोन ते अडीच तासांनंतर वाहतूक पुन्हा सुरळीत झाली. याप्रसंगी नागरिकांनी पावसाळी काळात रस्त्यांवर सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.





 
                       
                      