करमाळा तहसिल आवारात अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न..
करमाळा / संदेश प्रतिनिधी : भविष्यातील ऑक्सिजन, तसेच नागरिकांना उन्हापासून बचावासाठी सावली या भावनेतुन सर्व पोलीस बांधवांच्या पुढाकारातून पोलीसस्टेशन तसेच तहसीलकार्यालय परिसरातील मोकळ्या जागेत सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत 500 वृक्षारोपण करण्यात आले.
करमाळा तहसील कचेरी आवारामध्ये तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन, पंचायत समिती कार्यालय, खरेदी विक्री कार्यालय, भूमीअभिलेख कार्यालय तसेच स्टॅम्पदुकाने हे सर्व एकाच ठिकाणी असल्यामुळे येथे करमाळा तालुक्यातील सर्वच गावातील माणसांना या ठिकाणी यावे लागते. चालू वर्षी उन्हाळ्यात नागरिकांचे प्रचंड हाल झाले, कर्तव्यदक्ष पोलीस कॉन्स्टेबल श्री.घोरपडे व श्री.शेख व त्यांच्या सर्व सहकारी मित्रांनी प्रांतअधिकारी प्रियांका आंबेकर, तहसीलदार शिल्पा ठोकडे, उपविभागीय अधिकारी अजित पाटील, करमाळा पोलीस निरीक्षक घुगे, दुय्यम निबंधक श्री.कोकाटे तसेच सर्व गावाचे पोलीस पाटील यांच्या उपस्थितीत 500 वृक्षाचे रोपण करण्यात आले. यावेळी वृक्षमित्र व सामाजिक कार्यकर्ते काका काकडे तसेच तालुक्यातील अनेक मान्यवर तसेच नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.