पोथरे येथे अजितदांदांना श्रद्धांजली

करमाळा/ संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.१:पोथरे, (ता.करमाळा) येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार
यांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.

अजितदादा यांचा विमान अपघातात झालेल्या दुर्दैवी निधनाने महाराष्ट्र हा पोरका झाला असून महाराष्ट्राची ही पोकळी भरून येणार नाही अशा शब्दात ग्रामस्थांनी यावेळी श्रद्धांजली वाहिली.


यावेळी पत्रकार हरिभाऊ हिरडे नितीन झिंजाडे, सत्यम झिंजाडे, राजेंद्र झिंजाडे, मारुती लाढाणे, गिरीश झिंजाडे,सचिन पाटील, राज झिंजाडे आदी युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
