प्रजासत्ताक दिनानिमित्त उत्तरेश्वर मंदिरात तिरंगी सजावट
केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त येथील जागृत ग्रामदैवत श्री ऊत्तरेश्वर मंदिरात तिरंगा आरास मंदिराच्या दरवाज्यावर रंगी, बेरंगी फुग्यानी केली तसेच शिवलिंगास तिरंगा रंगाची सजावटी केली.
ही सजावट सोमनाथ गुरव, दिगंबर,गुरव,शंकर देवकर यानी हि सजावट केली तसेच श्री ऊत्तरेश्वर देवस्थान ट्रस्टचे वतीने या वर्षी बाजार पटांगणात ध्वजारोहण करण्यात आले. तिरंगा सजावटीचे श्री ऊत्तरेश्वर देवस्थान ट्रस्टचे सदस्य विजय बप्पा तळेकर व मंहत जयंतगिरी महाराज यांनी कौतुक केले हि आरास पाहण्यासाठी भाविकांनी मंदिरात मोठी गर्दी केली होती.