उच्च शिक्षण कसे पुर्ण होईल यासाठी प्रयत्न करा – कलिम काझी
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : मुस्लिम समाजातील युवकांनी प्रशासनात आपल्या नोकरीचा टक्का वाढवयाचा असेल दहावी, बारावी पर्यंतच शिक्षण होईल असे न करता किंवा मध्येच शिक्षण खंडित न करता उच्च शिक्षणापर्यंत शिक्षण कसे पुर्ण होईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे, आपल्या बौद्धिक क्षमता ओळखून त्या त्या क्षेत्रात झोकून देवुन चमकदार कामगिरी करण्याचा प्रयत्न करावा. असे मत मुस्लिम समाजाचे मार्गदर्शक विचारवंत कलीम काझी सर यांनी व्यक्त केले.
करमाळा शहरातील नामदेवराव जगताप उर्दू शाळा नववी व दहावी या दोन वर्गाला मान्यता मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न करण्याचे काम तसेच या कामाचा सतत पाठपुरावा करून त्याला यश प्राप्त झाले असे हाजी आसिफ जाफर शेख व ए.पी.जे अब्दुल कलाम फाॅन्डेशनचे संस्थापक अध्यक्ष समिर शेख, मजहर नालबंद या मान्यवरांचा सत्कार रेहनुमा चॅरिटेबल सोशल वेल्फेअर संस्था व करमाळा मुस्लिम समाज यांच्यावतीने सत्कार करण्यात आला.
याबाबत पुढे बोलताना ते म्हणाले कि, स्पर्धाचे युग असुन या स्पर्धेच्या युगात सर्व गुण संपन्न असे शिक्षण घेऊन आभ्यासात सातत्याने प्रयत्न करावे व उज्वल यश कसे मिळवावे यांचे मार्गदर्शन केले आहे, शिक्षणाने प्रत्येकाला नोकरीच मिळेल असे नाही, परंतु तुमच्या वैचारिक पातळीने समाजातील चांगल्या व वाईट गोष्टी चा फरक समजण्यास मदत होईल. आपल्या कुटुंबाची आर्थिक उन्नती कशी होईल याचा प्रामुख्याने विचार करावा, असेही त्यांनी म्हटले आहे.
याप्रसंगी हा सत्कार रेहनुमा चॅरिटेबल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हाजी कलीम काझी सर व डॉ समीर बागवान यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाची प्रस्तावना आझाद शेख यांनी केली, यावेळेस हाजी असिफ शेख व समीर शेख यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी सुरज शेख(सचिव),ईमत्याज पठाण(उप अध्यक्ष),जीशान कबीर(सदस्य),जमीर सय्यद (विश्वस्त जामा मस्जिद),जमिल काझी,गुलाम सय्यद,जहांगीर बेग,पिंटू बेग,यासीन सय्यद,अल्ताफ दारूवाले,कलीम शेख,पत्रकार बंधू अशपाक सय्यद,दिनेश मडके,अलीम शेख,सिद्धार्थ वाघमारे उपस्थित होते या कार्यक्रमाचे आभार सामाजिक कार्यकर्ते मुस्तकीम पठाण यांनी केले.