प्रत्येक खेडेगावात आरोग्य समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Saptahik Sandesh

प्रत्येक खेडेगावात आरोग्य समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष चळवळ महाराष्ट्रातील 27 जिल्ह्यात पोचली असून या माध्यमातून शिवसेनेचे 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण हे उद्दिष्ट साध्य होत असून
शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाचा निस्वार्थीपणे काम करणारा कार्यकर्ता प्रत्येक खेडेगावात तयार करा व आरोग्य समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करा असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुख यांचा सत्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदे यांनी केला, यावेळी आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत उद्योग मंत्री उदय सामंत उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई कृषिमंत्री अब्दुल सत्तार मंत्री दादा भुसे पक्ष प्रवक्ते संजय शिरसाठ पक्षाचे सचिव नरेश मस्के संजय मोरे सोलापूर शिवसेना संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत यांनी सत्कार केला.

उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस पद्मभूषण अण्णा हजारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी माजी कृषिमंत्री सदाभाऊ खोत
माझी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सत्कार केले. वाढदिवसानिमित्त घेतलेल्या रक्तदान शिबिरात 48 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

सत्कारासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाचे पदाधिकारी ठाणे येथे आले होते, यावेळी बोलताना खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले की, निस्वार्थीपणे काम करणारा माणूसच वैद्यकीय मदत क्षेत्रात काम करू शकतो, प्रयत्नामुळे एखाद्याचे प्राण वाचू शकते किंवा त्याला उपचार मिळून त्याचे आयुष्य वाढू शकते विशेषता सर्वसामान्य गोरगरिबांना आजारावर उपचार करणे आर्थिक अडचणीचे ठरते, यामुळे सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष हा एक आदर्श प्लॅटफॉर्म तयार झाला असून याच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात प्रामाणिकपणे जनतेची सेवा करणारे कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण झाले आहे. डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन च्या माध्यमातून जवळपास महाराष्ट्रात 260 रुग्णवाहिकांचे वाटप करण्यात आले असून गेल्या सात वर्षात जवळपास 3400 आरोग्य शिबिरे घेऊन लाखो लोकांना उपचाराची सोय करून दिली आहे.

डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन च्या वतीने जवळपास दोन लाख चष्म्याची मोफत वाटप करण्यात आले आहे, शिवाय राज्यात नव्हे तर देशात ज्या ज्या ठिकाणी आपत्कालीन संकट आले त्या त्या ठिकाणी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष मोठी मदत घेऊन गेलेली आहे, विशेषता केरळ येथे झालेल्या महापुरात अडकलेल्या लोकांना मदत करण्यासाठी जवळपास 200 डॉक्टर आणि केरळ येथे पंधरा दिवस मोफत सेवा देत होते अशा अनेक आपत्कालीन प्रसंगात शिवसेना मदत पक्षाने महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे याचा मला अभिमान आहे, आज सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मंगेश चिवटे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आरोग्य शिबीर रक्तदान शिबिर अपंगांना साहित्य वाटप असे आरोग्य संदर्भातले मोठे मोठे शिबिर घेण्यात आले.

सत्काराला उत्तर देताना मंगेश चिवटे म्हणाले की, महाराष्ट्रातील संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सर्वसामान्य लोकांना मदत करण्याची दानत व हिम्मत आहे, डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून मोठा आर्थिक निधी अडचणीतल्या रुग्णांना मिळत असल्यामुळे ही चळवळ बळकट होत आहे. या चळवळीत काम करण्यासाठी अत्यंत निस्वार्थी व प्रामाणिक कार्यकर्ते संपूर्ण महाराष्ट्रातून मिळत असल्यामुळे ही चळवळ यशस्वी ठरत आहे.

मुख्यमंत्री वैद्यकीय पक्षाच्या माध्यमातून नऊ महिन्यात जवळपास 72 कोटी रुपयांची मदत सर्वसामान्य रुग्णांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. शिवाय हजारो रुग्णांना कॅन्सर बायपास सर्जरी अनेक सर्जरीसाठी मोफत स्वयं उपलब्ध करून दिली आहे.

या पुढील काळात प्रत्येक जिल्ह्यात किमान एक हजार लोकांना सेवा देणारे निस्वार्थी कार्यकर्ते तयार करण्याचा संकल्प आमचा असून राजकारण विरहित गट तट पक्ष जात पंत न पाहता येणाऱ्या प्रत्येकाला माणुसकीच्या भावनेतून मदत करणे या भूमिकेतूनच शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष काम करीत असून मार्गदर्शक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अशा आम्हाला क** सूचना असल्यामुळे अत्यंत प्रामाणिकपणे आरोग्याचा महायज्ञ संपूर्ण महाराष्ट्रात काम करीत असून सर्वसामान्य लोकांना आरोग्य संदर्भात मदत मिळवून देण्यासाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष एक महाराष्ट्रातील जनतेला आदर्श आधार ठरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!