बिटरगाव (श्री) येथील तुकाराम मुरूमकर यांचे निधन

करमाळा (ता. २५) : बिटरगाव श्री (ता. करमाळा) येथील तुकाराम बाजीराव मुरूमकर (वय ५५) यांचे आज दुपारी तीन वाजता उपचारा दरम्यान निधन झाले. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
त्यांचा अंत्यविधी उद्या (दि.२६) सकाळी ७:३० वाजता बिटरगाव श्री येथील घराशेजारील शेतात होणार आहे. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना नातवंडे असा परिवार आहे. ते शांत व मनमिळावू स्वभावाचे होते. त्यांच्या अकस्मात मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. बिटरगावचे माजी सरपंच डॉ. अभिजीत मुरूमकर यांचे ते वडील होते.
एकाच महिन्यात मुरूमकर परिवारातील तिसऱ्या व्यक्तीचे आज निधन झाले आहे. याआधी बिटरगाव (श्री) येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे चेअरमन लालासाहेब विनायक मुरूमकर यांचे १४ मे ला हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते तर त्यांची सून मनिषा नितीन मुरूमकर यांचे ७ मे ला शेतात अपघाती निधन झाले होते.