इंडियन फाॅरेस्ट सव्हिर्ससाठी निवड झालेल्या तुषार शिंदे यांचा केम येथे सत्कार

केम (प्रतिनिधी संजय जाधव) – करमाळा तालुक्यातील कंदर येथील तुषार श्रीहरी शिंदे यांची यु.पी एस.सी मार्फत घेण्यात आलेल्या इंडियन फाॅरेस्ट सव्हिर्स विभागाच्या परीक्षेत देशात ३६ व्या रँकने निवड झाली. याबद्दल शिवसेना (ठाकरे गट) यांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.

तुषार शिंदे हे कंदर येथील निष्ठावंत शिवसैनिक श्रीहरी शिंदे यांचे चिरंजीव आहेत. यामुळे शिवसेनेच्या (ठाकरे गट) वतीने हा सत्कार करण्याचे ठरविले होते. या कार्यक्रमाला युवा सेनेचे सागर तळेकर,तालुका उपप्रमुख श्रीहरी तळेकर, माजी उपतालुकाप्रमुख उत्तरेश्वर तळेकर प्रसिध्दी प्रमुख अविनाश तळेकर ऊत्तरेश्वर गोडगे, आदि उपस्थित होते. या वेळी युवा सेनेचे सागर तळेकर म्हणाले की ग्रामीण भागातील विद्यार्थी यु.पी.एस.सी सारख्या अवघड परिक्षेत देशात ३६ वा क्रमांक मिळवून तुषार शिंदे यांनी जे यश संपादन करून दाखवले हा आदर्श तालुक्यातील इतर विद्यार्थ्यांनी घ्यावा.

Related News – कंदर मधील तुषार शिंदे यांची इंडियन फॉरेस्ट सर्व्हिससाठी झाली निवड – देशात ३६ वी रँक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!