किरकोळ कारणावरून सावडी येथे दोघांना बेदम मारहाण..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : किरकोळ कारणावरून सावडी येथे दोघांना बेदम मारहाण करण्यात आली असून, हा प्रकार ७ जानेवारीला दुपारी तीनच्या सुमारास घडला आहे. या प्रकरणी विजय जनार्धन भराटे (वय ४८) यांनी फिर्याद दिली आहे.
त्यात त्यांनी म्हटले आहे, की ७ जानेवारीला दुपारी तीनच्या सुमारास मी जनावरांना चारा टाकण्यासाठी घरातून बाहेर आल्यानंतर किरकोळ कारणावरून माझ्या पुतण्या सागर भराटे याची बायको अक्षदा भराटे हिने अर्वाच्च भाषेत बोलण्यास सुरूवात केली. त्यानंतर मी चिडून तिला शिवीगाळ केली.
त्यावेळी माझा भाऊ सुरेश जनार्धन भराटे व भावजय विमल सुरेश भराटे हे आले या दोघांनी मिळून मला जमिनीवर पाडून लाथाबुक्क्यांनी व काठीने मारहाण केली. त्यावेळी माझा मुलगा अजय भराटे हा भांडणे सोडविण्यासाठी आला असा त्यासही मारहाण केली. त्यानंतर आम्ही करमाळा पोलीस ठाणे येथे आलो. त्यावेळी माझी मुलगी पल्लवी नितीन गोलांडे हिचा फोन आला व तिने आई व मला सागर भराटे, गणेश संतोष नवले व बारक्या नवले यांनी मारहाण करून दमदाटी केली. या प्रकरणी पोलीसांनी सुरेश जनार्धन भराटे, विमल सुरेश भराटे, सागर सुरेश भराटे, अक्षदा सागर भराटे, गणेश संतोष नवले, बारक्या नवले या सहा जणांविरूध्द पोलीसात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.