उजनी धरणाची प्लस मध्ये वाटचाल! - Saptahik Sandesh

उजनी धरणाची प्लस मध्ये वाटचाल!

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – सोलापूर जिल्ह्याची जीवनदायींनी असलेल्या उजनी धरणाची आता प्लस मध्ये वाटचाल सुरू झालेली आहे. आज दिनांक २६ जुलै रोजी सकाळी नऊ वाजता उजनी धरण प्लस मध्ये आले आहे. उजनी धरणाचा मृत साठा हा ६३.२५ टीएमसी इतका आहे. आज २६ जुलै, संध्याकाळी ६ च्या सुमारास मिळालेल्या माहिती नुसार उजनीत ६९.३८ टीएमसी इतका पाणीसाठा झालेला आहे. उजनी धरणात सध्या एक लाख ६५ हजार ३७७ क्युसेक्स ने दौंड मधून पाणी जमा होत आहे. पाणी पातळी ४९१.९८० मी. इतकी आहे. सध्या धरण +१०.६७ टक्के भरले आहे.

यंदा (२०२४) मे महिन्यात उजनी धरणाने मायनस साठ (-६०) टक्के एवढं नीचांकी पातळी गाठली होती. मागील काही दिवसापासून उजनी धरण क्षेत्र परिसरात आणि पुणे जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरण आज प्लस मध्ये आलेले आहे.

उजनी धरणाची क्षमता

उजनी धरण 100 टक्के भरल्यानंतर 117 टीएमसी पाणीसाठा जमा होतो, तर 111 टक्के भरल्यानंतर 123 टीएमसी पाणीसाठा जमा होतो. 63.65 टीएमसी मृत साठ्यात धरले जाते, तर 53.34 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा धरला जातो.

उजनी धरणात ज्या इतर धरणांतून पाणी येते त्यांची नावे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!