वांगी नं.१ ग्रामपंचायतीत सरपंच-उपसरपंच पदाची बिनविरोध निवड; सुरेखा दिवटे सरपंच तर नरसिंग (मामा) देशमुख उपसरपंच



करमाळा/ संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.२१: वांगी नं.१ ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदासाठी सोमवार, दि. १६ फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक प्रक्रिया पार पडली. माजी जिल्हा परिषद सदस्य निळकंठ (आप्पा) देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सर्व ग्रामपंचायत सदस्यांची बैठक बोलावण्यात आली होती.
या निवडणुकीसाठी प्रशासक म्हणून निवडणूक निर्णय अधिकारी तथा मंडल अधिकारी विशाल गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच ग्रामविकास अधिकारी श्री विद्यानंद पाटील हेही उपस्थित होते.
निवडणूक प्रक्रियेदरम्यान सरपंच पदासाठी सौ. सुरेखा मगनराव दिवटे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. तर उपसरपंच पदासाठी वांगी नं.१ लोकविकास सहकारी दूध उत्पादक संस्थेचे संस्थापक श्री नरसिंग (मामा) देशमुख यांची एकमताने निवड करण्यात आली.

ही निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली असून ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. यावेळी माजी सरपंच सौ. शुभांगी संतोष देशमुख, माजी उपसरपंच आबासाहेब दैन, ज्येष्ठ नागरिक दिगंबर (भाऊ) पाटील, मा. श्री तुकाराम (आप्पा) देशमुख, श्री कालिदास भोसले, सदस्य हरिभाऊ तकीक, श्री प्रताप (आण्णा) देशमुख, श्री हैबतराव (भाऊ) देशमुख, मा. सरपंच श्री संजय कदम, श्री मगन दिवटे, मा. उपसरपंच गोरख आप्पा देशमुख, सदस्य तानाजी (काका) देशमुख, प्रगतशील बागायतदार पै. श्री हनुमंत (दादा) पाटील, सदस्य श्री धनंजय (बापू) गायकवाड, मा. श्री पैलवान राहुल (आबा) जगताप, लोकविकास सहकारी दूध उत्पादक संस्थेचे चेअरमन मा. श्री सचिन (दादा) देशमुख, सदस्य श्री दत्ता (बापू) देशमुख, श्री दशरथ (बापू) देशमुख, श्री प्रकाश महाडिक पाटील, सदस्य श्री सोमनाथ ढावरे, सदस्य कुमार ढावरे, श्री नागनाथ (बाबुनाना) देशमुख, श्री नितीन देशमुख, श्री सतीश देशमुख, उद्योजक धीरज देशमुख, निलेश भोसले, श्री राजकुमार देशमुख, श्री पिंटू दिवटे, बंधु हर्षद दिवटे, श्री नितीन दिवटे, श्री आदिनाथ पोपटराव कदम, श्री आप्पा दिवटे, श्री उमेश दैन, राहुल पाटील तसेच वांगी पंचक्रोशीतील अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवीन सरपंच व उपसरपंच यांच्या निवडीमुळे गावाच्या विकासाला नवी गती मिळेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.



