करमाळा येथे महिला उद्योग प्रदर्शन सुरू

करमाळा(दि.१०): राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळा येथे महिलांसाठी उद्योग प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. रविवार दि. ९ फेब्रुवारी ते मंगळवार दि. ११ फेब्रुवारी असे तीन दिवस करमाळा बायपास रोड वरील छोटू महाराज सिनेमा थिएटरच्या प्रांगणात हे प्रदर्शन सुरु आहे.
रविवारी सकाळी अकरा वाजता शिवसेनेचे युवा नेते दिग्विजय बागल यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे करे पाटील, अॅड. नाना कारंडे, पै. विकी शिंदे, सतीश नीळ, अनिल अनारसे, प्रा. शिवाजी बंडगर, बाबासाहेब सरडे, जगदंबा मूकबधिर शाळेचे मुख्याध्यापक काळे सर आणि शिक्षकवृंद, संतोष लाड, योगेश सोरटे, भाजप शहरप्रमुख जगदीश आगरवाल, ॲड. प्रियाल अग्रवाल आदीजन उपस्थित होते.

हे प्रदर्शन रविवारी सकाळी ९:३० ते रात्री ९:३० पर्यंत होते तर सोमवारी व मंगळवारी संध्याकाळी ५ ते ९:३० पर्यंत सूरु आहे. यामध्ये महिलांनी ग्रुहोपयोगी वस्तूंपासून ब्युटी पार्लर, ज्वेलरीसह विविध वस्तू विक्रीस ठेवलेले आहेत. या प्रदर्शनास जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन या प्रदर्शनाचे आयोजक व युवासेना जिल्हा समन्वयक निखिल चांदगुडे यांनी केले आहे.





