अनावश्यक सलाईन व इंजेक्शन शरीरासाठी धोकादायक! – डॉ. सुभाष सुराणा -

अनावश्यक सलाईन व इंजेक्शन शरीरासाठी धोकादायक! – डॉ. सुभाष सुराणा

0

करमाळा : जीवनामध्ये जर खऱ्या अर्थाने आपणाला यश मिळवायचा असेल तर शरीर स्वास्थ्य हे अत्यंत महत्त्वाचे आहे.ज्याचे शरीर स्वास्थ चांगले आहे, तो विश्वही जिंकू शकतो,असे मत सामाजिक कार्यकर्ते डॉ. सुभाष सुराणा यांनी व्यक्त केले.

नगररस्त्यावरील संदेश कृषी पर्यटन मध्ये ग्राम सुधार समिती द्वारे आयोजित जिव्हाळा ग्रुपच्या मेळाव्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान उपाध्यक्ष महेंद्र पाटील हे होते.

यावेळी व्यासपीठावरती आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष प्रा. शहाजीराव देशमुख लोकविकास दूध संस्थेचे अध्यक्ष दीपक आबा देशमुख,बाजार समितीचे माजी सभापती प्रा. शिवाजीराव बंडगर, के.डी. एक्सपोर्ट कंपनीचे मालक किरण डोके,पवार ट्रॅक्टरचे मालक दत्तात्रय पवार, उद्योजक वैभव पोळ यश कल्याणीचे अध्यक्ष गणेश करे- पाटील, ज्येष्ठ कवी प्रकाश लावंड माजी प्राचार्य नागेश माने आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

प्रा.संजय चौधरी कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना

पुढे बोलताना डॉ.सुराणा म्हणाले की,स्वास्थ्य मिळवण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागत नाही. स्वास्थ मिळण्यासाठी दिवसातून किमान चार किलोमीटर चालणे हाच महत्त्वाचा उपाय आहे. आपल्याला यम-नियम यामध्ये संतोष हा एक शब्द आलेला आहे. हा संतोष कधी निर्माण होतो सुख अधिक आनंद या दोन्ही गोष्टी एकत्रित आल्यातर संतोष मिळतो.सुख वस्तूतून मिळेल पण आनंद मिळवायचा असेल तर त्यासाठी शारीरिक आरोग्य अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणजे घरामध्ये पंचपक्वानांचे जेवण आहे परंतु तुम्हाला मधुमेह असल्यामुळे खाता येत नाही तर तुम्हाला आनंद मिळत नाही. यासाठी काही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत त्या म्हणजे शुगर ही कंट्रोल करणे गरजेचे आहे आणि त्यावर सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे चालणे हाच आहे.

अनावश्यक सलाईन व इंजेक्शन शरीरासाठी धोकादायक!

अलीकडे वैद्यकीय व्यवसाय हा व्यवसाय न राहता धंदा झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःची काळजी घेतली पाहिजे. अनावश्यक रक्त तपासण्या,अनावश्यक दवाखान्यात दाखल होणे,अनावश्यक सलाईन लावणं,अनावश्यक इंजेक्शन, अनावश्यक आय.सी.यु. मध्ये ॲडमिट होणे या टाळल्या पाहिजेत. गोष्टीकडे आपण लक्ष दिले पाहिजे. जे औषध तोंडावाटे देता येत नाही तेच औषध इंजेक्शनच्या माध्यमातून दिले पाहिजे पण आपण काही झालं की उठ सुट सलाईन लावतो व इंजेक्शन घेतो हे चुकीचे आहे. ज्याचा बीपी नॉर्मल आहे त्याला कधीही सलाईन लावण्याची गरज नाही. व्हायरल आजार जे असतात ते आठ ते नऊ दिवसात बरे होत असतात. जेव्हा छातीत जास्त दुखत असते तेव्हा शौचालयाला जाऊ नका आणि कन्हु नका,ठसका काढा, खोकला काढला की हृदयाचे पंपिंग चांगलं होतं.अशाही आरोग्याच्या खूप महत्त्वाच्या टिप्स डॉ. सुराणा यांनी दिल्या.

यावेळी प्रा. डॉ. संजय चौधरी , यशकल्याणीचे गणेश करे-पाटील, प्रा. सुहास गलांडे ,साहित्यिक भीष्माचार्य चांदणे ,अर्जुनाआबा  तकिक, पत्रकार सुहास घोलप ,केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सचिन साखरे, सामाजिक कार्यकर्ते निळकंठ ताकमोगे, शिक्षक भारतीचे विजयकुमार गुंड ,शिक्षक संतोष मंजुळे,  महेंद्र पाटील, प्रा.शहाजीराव देशमुख अंधश्रद्धा निर्मूलनचे जिल्हा कार्याध्यक्ष अनिल माने, सेंद्रिय शेतीचे हनुमंत यादव यांची भाषणे झाली.

यावेळी निवृत्त मुख्याध्यापक लक्ष्मणराव लष्कर यांनी विविध गीते तर प्रेमराज शिंदे ,पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष संदीप पाटील यांनीही यावेळी गीत सादर केले. कलाकार सलीम सय्यद व समशेर सय्यद यांनी ढोलकी व ताशा याचे वादन केले तर माजी प्राचार्य एन. एम. माने यांनी बासरी वादन केले. कवी खलील शेख ज्येष्ठ काही प्रकाश लागवड नितीन तकिक यांनी आपल्या कविता यावेळी सादर केल्या.

ॲड.डॉ.बाबूराव हिरडे कार्यक्रमात बोलताना

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र रणसिंग यांनी केलं तर उपस्थितांचे स्वागत ग्राम सुधार समितीचे अध्यक्ष ॲड.डॉ.बाबूराव हिरडे यांनी केले ,तर आभार प्रा.शिवाजीराव बंडगर यांनी मांडले. सुत्रसंचलन पत्रकार गजेंद्र  पोळ व शिक्षक सचिन गाडेकर  यांनी केले. उपस्थितांचे सत्कार कैलास अण्णा लबडे,माजी मुख्याध्यापक एन.डी. सुरवसे , नाथाजीराव शिंदे ,संतोष माने , बाळासाहेब दुधे, प्रशांत नाईकनवरे राजेंद्र साने, संजय हांडे  यांनी केले.

या कार्यक्रमासाठी डॉ. शारदा सुराणा तसेच माजी मुख्याध्यापक दादा झिंजाडे, किरण कुलकर्णी ,डॉ. शिवाजी दळवी नागनाथ गात दत्तात्रय दास डॉक्टर आप्पासाहेब लांडगे शिवाजी आप्पा अरुण धुमाळ भारत शेठ वांगडे शुभम जाधव तात्यासाहेब कळसाईत कृषी मंडल कृषी अधिकारी मधुकर मारकड  ,सुनील गायकवाड अशोक शिंदे तसेच व्यापारी एडवोकेट संकेत खातेर गिरीश शहा, वांगी येथील आनंद पतसंस्थेचे सचिव भारत रोकडे तसेच प्रतापराव बागल ,भरतरीनाथ मोडके डॉ. विजयकुमार जाधव या कार्यक्रमाच्या संयोजनासाठी नानासाहेब पठाडे, अनिल महादेव झिंजाडे, माऊली झिंजाडे, शहाजी धर्म रोही, अशोक आनंद झिंजाडे, आबासाहेब ठोंबरे, अमर शिंदे, गणेश ढवळे,  संदीप हिरडे, शरद हिरडे आदींनी मेहनत घेतली तर यावेळी उपस्थित त्यांच्या स्वागत राजेंद्र धांडे , रामचंद्र बोधे विठ्ठल खंडू शिंदे ,भारत साळुंखे भारतराव ढेरे  आदिनाथ चे संचालक श्रीमान चौधरी, संतोष महाडिक  रवींद्र रणसिंग, रवींद्र जावळे, प्रदीप वाघमोडे, बाबासाहेब चौगुले, मच्छिंद्र पाटील, शुभम बंडगर ,विजय दादा पवार ,संतोष काका कुलकर्णी, हरिचंद्र झिंजाडे ,दीपक देशमुख आदी प्रतिनिधींनी या कार्यक्रमाचे संयोजन केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!