धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचाराने समाजसेवा करणार : उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : धर्मवीर आनंद दिघे यांनी सर्वसामान्य माणसांना न्याय देत असताना वेळप्रसंगी प्रस्थापितांना दोन हात करण्याची भूमिका घेतली त्याच पद्धतीने करमाळा तालुक्यातील सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे असे मत शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील यांनी व्यक्त केले
धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेनेचे मुख्य कार्यालयात दिघे यांच्या प्रतिमेचे पूजन जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी हिवरवाडी चे माजी सरपंच राजेंद्र मिरगळ, कॉन्ट्रॅक्टर बंडूशेठ बनसोडे युवा सेनेचे तालुकाध्यक्ष राहुल कानगुडे, नासिर कबीर, शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाचे लक्ष्मण सुरवसे, गटप्रमुख नागेश शेंडगे, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख निखिल चांदगुडे, उपतालुकाप्रमुख सतीश रुपनवर, दादा थोरात, शहर प्रमुख संजय शीलवंत, उपसर प्रमुख नागेश गुरव आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना अनिल पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून करमाळा तालुक्यातील विकासाच्या कामांना गती मिळाली आहे. धर्मवीर आनंद दिघे यांनी कोणतीही निवडणूक न लढवता सर्वसामान्यांच्या सेवेसाठी आपले आयुष्य वेचले विशेषता आरोग्य सेवा देण्यासाठी त्यांचा भर होता. येणारा काळात करमाळा शिवसेनेच्या वतीने करमाळा तालुक्यातील प्रत्येक गरजूंना आरोग्य सेवा देण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी कटिबद्ध असल्याचे उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील यांनी सांगितले.





