करमाळ्यातील उर्दू शाळेस 'आदर्श शाळा' पुरस्कार प्राप्त.. - Saptahik Sandesh

करमाळ्यातील उर्दू शाळेस ‘आदर्श शाळा’ पुरस्कार प्राप्त..


करमाळा/ संदेश प्रतिनिधी :
करमाळा : महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेचेवतीने करमाळा शहरातील कै.नामदेवराव जगताप नगरपरिषद प्राथमिक उर्दु शाळेस आदर्श शाळा पुरस्कार मिळाला असुन, महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेचे अध्यक्ष गफार शेख यांच्या हस्ते उर्दू शाळेचे मुख्याध्यापक जुबेर जनवाडकर यांना देण्यात आले, यावेळी शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे, फारूक शाब्दी आदी मान्यवर उपस्थित होते.

कै.नामदेवराव जगताप नगरपरिषद प्राथमिक उर्दु शाळेत पहिली ते दहावी पर्यंत शिक्षण असलेली एकमेव शाळा असून, या शाळेचा निकाल दरवर्षी चांगला लागत आहे. खेळातही अतिशय उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे, शाळेत असलेले योग्य नियोजन व उत्कृष्ट शिक्षक वर्ग यामुळे महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेने याची दखल घेऊन आदर्श शाळा पुरस्कार जाहीर केला आहे.

या शाळेसाठी मुख्याध्यापक जुबेर जनवाडकर त्यांचे सहकारी शिक्षक, शिक्षिका तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मजहर नालबंद समितीचे सर्व सदस्य पालक वर्ग यांनी मेहनत घेतल्यामुळे आज शाळेचे नाव झाले आहे, आणि याची दखल घेऊन त्यांना आदर्श शाळा पुरस्कार प्रदान करण्यात आला, या उर्दु शाळेस आदर्श शाळा पुरस्कार मिळाल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक जुबेर जनवाडकर व सर्व शिक्षक शिक्षिका यांचे करमाळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राठोड, प्रशासन अधिकारी अनिल बनसोडे केंद्र समन्वयक दयानंद चौधरी, लिपिक शिवदास कोकाटे यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!