मराठा आरक्षण लढ्यात सहभागी होण्यासाठी आज दुपारी 3 वाजता
तातडीची बैठक
करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा,ता.१४: येत्या 20 जानेवारीला मनोज जरांगे पाटील यांनी आव्हान केल्याप्रमाणे मुंबईला आमरण उपोषण करण्यासाठी मराठी बांधवाना निघायचे आहे .मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे निघण्याचे आवाहन केले आहे श्री. जरांगे पाटील यांचे हात बळकट करण्यासाठी व मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी या मराठा आरक्षण लढ्यात मराठा समाजातील बंधू भगिनींनी सहभागी होण्यासाठी चर्चा विनिमय करण्यासाठी सोलापूर जिल्हा मराठा समन्वयक जिल्हा पदाधिकारी यांच्या उपस्थितीत विकी मंगल कार्यालयात आज रविवारी दुपारी 3 वाजता बैठक आयोजीत केली आहे तरी करमाळा तालुक्यातील तमाम मराठा बंधु-भगिणीनी आपला सहभाग नोंदवावा असे अवाहन संयोजकांनी केले आहे.