रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या अध्यक्षपदी वडशिवणेचे सुपुत्र गोविंद जगदाळे यांची निवड
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – करमाळा तालुक्यातील वडशिवणे गावचे सुपुत्र व सध्या पिंपरी-चिंचवड मध्ये कार्यरत असलेले असलेले गोविंद जगदाळे यांची रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या संचालक मंडळाचा आठवा पद्ग्रहन सोहळा दि. ३१ जुलै रोजी पिंपरी चिंचवड मध्ये संपन्न झाला. यावेळी श्री.जगदाळे यांची निवड करण्यात आली.
श्री. जगदाळे हे १९९८ पासून गेले २६ वर्षे झाले चिंचवड मध्ये ते विद्यार्थ्यांचे कोचिंग क्लासेस चालवत आहेत. याच बरोबर सामाजिक कार्याची आवड म्हणून त्यांनी रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी मध्ये सहभागी झाले. रोटरी क्लब मार्फत महिला सबलीकरण, आरोग्य, युवकांना स्किल बेस ट्रेनिंग, हॅप्पी स्कूल असे विविध सामाजिक प्रकल्प राबवले जात आहेत. मागील सात वर्षांपासून रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी च्या मार्फत पवनानदी संवर्धनासाठी विविध प्रकल्प राबवले जास्त असून जनजागृती केली जात आहे.
गेले अनेक वर्षांपासून गोविंद जगदाळे यांचे भोगेवाडी (ता. माढा जिल्हा सोलापूर) येथील संजयमामा माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मोफत गणित विषयाचे मार्गदर्शन चालू आहे. या कालावधीत शाळेतील शिक्षकांनी शाळेतील विविध अडचणी श्री जगदाळे सरांना सांगितल्याने त्यांनी या अडचणी सोडविण्याच्या दृष्टीने स्वतः संचालक असलेल्या रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी समोर मांडल्या. यानंतर सर्व सदस्यांनी सदर शाळेला मदत करण्याचे एकमताने मान्य केले तसेच रोटरी क्लब ऑफ पिंपरी इलाईटला सोबत घेत हॅप्पी स्कुल प्रकल्प राबवत शाळेला मोठ्या प्रमाणात मदत केली.
यामध्ये शालेय आवारात 50 फूट खोल विहीर त्यावरती एक मोटर, दहा संगणक , मुलांना बसण्यासाठी बेंचेस, ऑफिस फर्निचर, प्रत्येक विद्यार्थ्याला जेवणाचा स्टीलचा डबा , स्टीलची पाण्याची बॉटल व पेन इत्यादी वस्तू देण्यात आल्या. त्याचप्रमाणे शालेय आवारात वृक्षारोपण करण्यात आले.
रोटरी क्लब या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या शाखेच्या अध्यक्षपदी निवड होणे ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. मी ग्रामीण भागातून पुढे आलेलो असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आणि शाळेसाठी काम करण्याचा तसेच शेतकरी वर्गांना पिकांबद्दल मार्गदर्शन,माती परीक्षण यासारख्या गोष्टी उपलब्ध करून उत्पन्न वाढीसाठी मदत करण्याचा माझा मानस आहे.
– गोविंद जगदाळे