वैष्णवी पाटील हिची शालेय राष्ट्रीय स्पर्धेसाठी तिसऱ्यांदा निवड…
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे
आयोजित राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धा नांदेड या ठिकाणी घेण्यात आल्या सण २०२४-२५ या वर्षातील राज्यस्तरीय शालेय आर्चरी राज्यस्तरीय स्पर्धेत वैष्णवी ने सतरा वर्ष वयोगटांमध्ये मुलींच्या आर्चरी कंपाऊंड गटातून दोन ब्रांझ मेडल प्राप्त करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी सलग तिसऱ्या वेळेस पात्र ठरलेली आहे. गेल्या महिन्यात तिची चीन येथे आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी ही निवड झालेली होती.
वैष्णवी हिने 50 मीटर च्या पहिल्या फेरीत 360 पैकी 334 व दुसऱ्या साठ मीटरच्या फेरीमध्ये 3 33 गुण मिळवत दोन्ही गटात ब्रांच मेडल मिळवले आहे. शालेय राष्ट्रीय स्पर्धा या गुजरात येथील नादियाड या ठिकाणी 11 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर या दरम्यान होणार आहेत.
वैष्णवी सध्या लालबहादूर शास्त्री महाविद्यालय सातारा या ठिकाणी इयत्ता अकरावी या वर्गात शिकत असून ती दृष्टी अडचणी अकॅडमी सातारा या ठिकाणी प्रशिक्षक प्रवीण सावंत सर यांच्या मर्गदर्णखली सराव करते आहे.
याशिवाय करमाळा तालुक्यातील शिवम चिखले याने रिझर्व प्रकारात प्रथम क्रमांक मिळून राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरला.
वरकुटे येथील आणखीन दोन विद्यार्थी राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. जयहिंद जगताप इयत्ता नववी व रेहान मुलानी इयत्ता नववी यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.