कंदर येथे सय्यद शहानुर साहेब यांच्या याञेनिमत्त तीन दिवस विविध कार्यक्रम… - Saptahik Sandesh

कंदर येथे सय्यद शहानुर साहेब यांच्या याञेनिमत्त तीन दिवस विविध कार्यक्रम…

कंदर प्रतिनिधी/संदीप कांबळे

कंदर : कंदर (ता.करमाळा) येथील ग्रामदैवत तथा हिंदू मुस्लीम धर्माचे प्रतिक मानल्या जाणार्या सय्यद शहानुर साहेब यांच्या याञेनिमत्त शनिवार ता.22 पासून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याची माहीती याञा समितीने डिजिटल संदेशला दिली. शनिवार ता.22 रोजी राञी नऊ वाजता संदल मिरवणूक होईल. तसेच रविवार हा याञेचा मुख्य दिवस असून सायं चार वाजता गाड्या ओढण्यात येणार आहेत. राञी नऊ वाजता छबिना मिरवणूक होईल. सोमवार रोजी दुपारी चार वाजता नामांकित मल्लांच्या निकाली कुस्त्या होणार आहेत. तसेच राञी नऊ वाजता ग्रामस्थांच्या मनोरंजनासाठी ऑकेस्ट्रा होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!