शहीद मेजर अमोल निलंगे यांचा ६ वा स्मृतिदिन विविध कार्यक्रमांनी संपन्न..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : साडे (ता.करमाळा) येथे २४ जानेवारी रोजी शहीद मेजर अमोल निलंगे यांच्या ६ व्या स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी डॉ. निलेश मोटे, सचिन गाडेकर, संजय साळुंखे यांना सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यश कल्याणीचे संस्थापक अध्यक्ष गणेश करे पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्राम सुधार समितीचे अध्यक्ष डॉ.ॲड.बाबुराव हिरडे हे उपस्थित होते. भारतीय माजी सैनिक संघटनेचे उपाध्यक्ष अरुण कुमार तळीखेडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले तर सैनिक संघटनेचे दिपक राजे शिर्के रावसाहेब साळुंखे अक्रूर शिंदे हे व्यासपीठावर उपस्थित होते याप्रसंगी शहीद निलंगे यांच्या स्मारकाचे पूजन करुन पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. प्रथमतः उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते शहीद कुटुंबीयांचा सन्मान करण्यात आला. निलंगे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित निबंध व चित्रकला स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी यश कल्याणीचे संस्थापक अध्यक्ष गणेश करे-पाटील यांनी यावेळी शहिदांच्या आठवणींना उजाळा देत, त्यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. तसेच याप्रसंगी ॲड.हिरडे, तळीखेडे, शिर्के, साळुंखे, मेजर सुनील दौंडे यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
याप्रसंगी करमाळा पंचायत समितीचे माजी उपसभापती गोकुळ पाटील पंचायत समिती सदस्य दत्तात्रय जाधव आदिनाथ चे माजी संचालक वसंतराव पुंडे साडे शिक्षण संस्थेचे सचिव देविदास ताकमोगे माजी उपसरपंच कालिदास ढवळे सदस्य गोकुळ मोरे सेवानिवृत्त मुख्याध्यापिका नीलिमा पुंडे कल ढोणे मॅडम आजी-माजी सैनिक व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विठ्ठल कादगे कालिदास ढवळे बाळासाहेब आडेकर सर्व आजी-माजी सैनिक आणि ग्रामस्थ यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन गाडेकर यांनी केले तर आभार संदीप ठाकर यांनी मानले. शहीद निलंगे यांचे पिताश्री अरविंद निलंगे व मातोश्री अंजली निलंगे यांचाही गौरव करण्यात आला.