ऊत्तरेश्वर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न - Saptahik Sandesh

ऊत्तरेश्वर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) : केम तालुका करमाळा येथील जागृत ग्रामदैवत श्री ऊत्तरेश्वर मंदिरात अन्नछत्राच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये उत्तरेश्वर महाराज यांच्या शिवलिंगास लघु रुद्राभिषेक केम मधील अकरा ब्राह्मणांनी केला. त्यानंतर 21 दांपत्याच्या हस्ते सत्यनारायण महापूजा करण्यात आली. त्यानंतर सत्यनारायण महाराज उत्तरेश्वर महाराज व अन्नपूर्णा मातेची आरती करून महाप्रसादाला सुरुवात झाली. यामध्ये केम ग्रामस्थ व पंचक्रोशीतील हजारो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. चेअरमन दादासाहेब गोडसे यांच्या शुभहस्ते मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. यावेळी पुजारी समाधान गुरव यांनी उत्तरेश्वर महाराजांचे श्री संत तुकाराम महाराज यांच्या विषयातील आकर्षक अशी सजावट केली होती.

यासाठी रक्तदाते संघटनेचे कार्यकर्ते बाळासाहेब साखरे गणेश शेटे दत्ता पाटील दत्ता देवकर केदार पळसकर समाधान फरड अण्णा मोरे चंद्रकांत तळेकर यांनी परिश्रम घेतले यावेळी महिलांची जेवणाची व्यवस्था सौ गोडसे सौ पुष्पा शिंदे सौ रत्नमाला साखरे यांनी चोख पार पाडली. सर्वांचे आभार उत्तरेश्वर रक्तदाते संघटनेचे सचिव दत्तात्रय कुलकर्णी यांनी मांडले. हा सर्व विधी केमधील कुलकर्णी बंधू यांच्या हस्ते पार पडला यावेळी ज्येष्ठ नेते दिलीप दादा तळेकर जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध अण्णा कांबळे व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष सागर दौड, उपाध्यक्ष सागर राजे तळेकर देवस्थान ट्रस्टचे सर्व सदस्य उपस्थित होते या कार्यक्रमासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!