गुरू पौर्णिमेनिमित्त ऊत्तरेश्वर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

केम(संजय जाधव): केम येथील ग्रामदैवत श्री ऊत्तरेश्वर मंदिरात गुरू पौर्णिमेच्या निमित्ताने गुरुवारी दि. १० जुलै विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

मंदिराचे मंहत जयंतगिरी महाराज यांनी या कार्यक्रमाची माहिती दिली. या कार्यक्रमाची सुरवात सकाळी ८ वाजता श्री ऊत्तरेश्वर देवस्थान व मंदिरातील सर्व देवतांना अभिषेकाने होणार आहे. त्यानंतर सकाळी १० ते १२ या वेळेत ह.भ.प. स्वप्नील महाराज शिंदे (पाथुर्डी) यांचे कीर्तन होईल. कीर्तनानंतर दुपारी १२ वाजून ५ मिनिटांनी पुष्पवृष्टी करण्यात येईल. या सर्व धार्मिक कार्यक्रमानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.

या पंचक्रोशीतील नागरिकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंहत जयंत गिरी महाराज व श्री ऊत्तरेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.





