श्री उत्तरेश्वर मंदिर, केम येथे १८ सप्टेंबरला विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

केम(संजय जाधव): केम येथील श्री उत्तरेश्वर मंदिरात ब्रह्मचैतन्य विद्यागिरी आनंदगिरी महाराज यांच्या १९ व्या पुण्यस्मरणानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संयोजक महंत जयंतगिरी महाराज यांनी दिली.

या अंतर्गत १८ सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते १० या वेळेत मंदिरातील समाधी व देवतांना अभिषेक करण्यात येईल. सकाळी १० ते १२ या वेळेत ह.भ.प. परमेश्वर मिस्किन महाराज यांचे कीर्तन होणार असून दुपारी १२ वाजता पुष्पवृष्टी व त्यानंतर महाप्रसादाचे वाटप होईल.

या धार्मिक कार्यक्रमासाठी विविध आखाड्यांचे साधुसंत उपस्थित राहणार असून, भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री उत्तरेश्वर देवस्थान ट्रस्ट व महंत जयंतगिरी महाराज यांनी केले आहे.



