चिखलठाण येथील तुळजाभवानी माता मंदिर येथे नवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

चिखलठाण : चिखलठाण (ता.करमाळा) येथील तुळजाभवानी माता मंदिर येथे नवरात्रीनिमित्त नवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्री स्वामी समर्थ प्रधान सेवा केंद्र दिंडोरी नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली स्वामी समर्थ सेवा चिखलठाण नंबर एक यांच्यावतीने नऊ दिवस दुर्गा सप्तशती पाठाचे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये गावातील बहुसंख्य महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता आठव्या दिवशी होम हवन महापुजा करण्यात आली . नवरात्रीनिमित्त दररोज संध्याकाळी दांडियाचाही कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मंदिराला भेट देणाऱ्या सर्व भाविकांसाठी खिचडी प्रसादाचे वाटप वाटप करण्यात आले होते.

यामध्ये गावातील दत्तात्रय बारकुंड, राजेंद्र चव्हाण, सतीश बनसोडे, रमेश चव्हाण, प्रमोद गव्हाणे, दिलीप शिंगटे, शिवाजी राऊत, संतोष चव्हाण, सुरेश चव्हाण, संतोष उंबरे, पुजारी दिगंबर ढवळे, भारत चव्हाण, शिवाजी बाजीराव सरडे, संजय उंबरे यांच्यासह गावातील भाविकांचा सहभाग होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!