करमाळा-माढा मतदार संघातील ६८ कोटींच्या विविध रस्त्यांना व बांधकामांना चालु अधिवेशनात मिळाली मंजुरी

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – महाराष्ट्र विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन दि. 7 डिसेंबर पासून नागपूर येथे सुरू झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी डिसेंबरच्या पुरवणी अर्थसंकल्पामध्ये बांधकामासाठी तरतूद केल्याची बजेट प्लेट आज (दि.८) जाहीर झाली असून यामध्ये करमाळा मतदार संघातील प्रमुख जिल्हा मार्ग, ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्ग यांच्यासह तलाठी व सर्कल कार्यालय बांधकामासाठी तब्बल 68 कोटी निधीची तरतूद करण्यात आली आहे. या भरघोस निधीमुळे तालुक्यातील मुख्य रस्त्यांचा प्रश्न निकाली निघणार आहे अशी माहिती आमदार संजयमामा शिंदे यांच्या कडून देण्यात आली आहे.

आमदार संजयमामा शिंदे

या निधीमधून करमाळा तालुक्यातील रस्ते विकासासाठी 41 कोटींचा निधी मंजूर झालेला आहे. यात खालील रस्त्यांचा समावेश आहे.

  • महसूल विभागातील 8 मंडळ अधिकारी कार्यालय व 20 तलाठी कार्यालयांची बांधकामे करण्यासाठी 4 कोटी 20 लाख निधीची तरतूद करण्यात आलेली आहे.
  • पारेवाडी ते वाशिंबे रस्ता मोठ्या पूलाचे बांधकाम करणे – 3 कोटी 47 लाख,
  • कुगाव-चिखलठाण-शेटफळ-जेऊर रस्ता – 4 कोटी 90 लाख,
  • पांडे-शेलगाव(क)-घोटी-केम रस्ता – 2 कोटी,
  • कोर्टी-दिवेगव्हाण-पारेवाडी रेल्वे स्टेशन रस्ता -3 कोटी
  • रावगाव-वीट-झरे-पोपळज-केडगाव रस्ता – 1 कोटी
  • मिरगव्हाण-अर्जुननगर-शेलगाव क सौंदे-वरकटणे या रस्ता – 1 कोटी
  • बोरगाव-करंजे-मिरगव्हाण-निमगाव-नेरले-वरकुटे रस्ता – 1 कोटी,
  • वांगी नंबर 2 ते इजीमा 12 या रस्ता – 2 कोटी,
  • फिसरे-हिसरे-हिवरे ते कोळगाव रस्ता – 2 कोटी,
  • केतुर 2 ते केतुर 1 वाशिंबे सोगाव रस्ता या रस्त्याचे रुंदीकरणासह काम करण्यासाठी 7 कोटी 50 लाख
  • मांजरगाव कोर्टी ते जिल्हा हद्द रस्ता – 5 कोटी,
  • केतुर 2 ते केतुर 1 वाशिंबे सोगाव रस्ता – 5 कोटी,
  • उमरड ते कोठावळे धनगरवाडी रस्ता – 1 कोटी
  • सोगाव ते प्रजिमा क्र.3 रस्ता – 1 कोटी 70 लाख

करमाळा मतदार संघाला जोडलेल्या माढा तालुक्यातील 36 गावांसाठी 23 कोटींचा निधी मंजूर झालेला आहे.

  • कव्हे-लहू-म्हैसगावरस्ता – 2 कोटी 70 लाख
  • रोपळे (क)-केम-वडशिवणे ते कंदर या रस्ता – 2 कोटी 70 लाख,
  • जिल्हा हद्द ते रिधोरे तांदूळवाडी सुलतानपूर रस्ता – 2 कोटी 40 लाख,
  • अकोले खुर्द-कन्हेरगाव-निमगाव-ढवळस रस्ता – 2 कोटी,
  • वडाचीवाडी ते सापटणे रस्ता – 1 कोटी 50 लाख,
  • वडाचीवाडी ते शिंदेवाडी रस्ता – 1 कोटी 80 लाख,
  • कुर्डु ते चोंबे पिंपरी रस्ता- 2 कोटी,
  • निमगाव (टें) ते उपळवटे 5 कोटी,
  • रोपळे ते मुंगशी रस्ता – 80 लाख,
  • कव्हे ते शिंगेवाडी रस्ता – 1 कोटी,
  • रोपळे-बिटरगाव-शिंगेवाडी रस्ता – 1 कोटी 20 लाख

असा एकूण करमाळा-माढा मतदारसंघासाठी तब्बल 68 कोटी निधी रस्ते व बांधकामासाठी मंजूर झालेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!