गौंडरे येथे हरिनाम सप्ताहासह विविध सामाजिक उपक्रम संपन्न

संग्रहित छायाचित्र

करमाळा : गौंडरे (तालुका करमाळा) येथे 29 मार्च ते 6 एप्रिल च्या दरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलेले होते. या कार्यक्रमाचे व्यासपीठ चालक ह.भ.प. सुभाष महाराज वाघमोडे होते.

या सप्ताहामध्ये विविध नामवंत कीर्तनकारांची कीर्तने आयोजित केली गेली होती. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात प्रथमच शिवचरित्राच्या संगीत कथेचे ७ दिवस (शिवगाथा ) आयोजन केले होते. शिव चरित्रकार रवींद्र शिंदे यांनी हा कार्यक्रम सादर केला. याच बरोबर पहाटे ५ ते ७ या वेळेत योग शिबीराचे आयोजन केले होते. आरणगाव ता .परंडा येथील योग शिक्षक ह भ प . कसपटे महाराज यांनी हे योगाचे धडे ग्रामस्थांना दिले.

30 एप्रिल रोजी नेत्र रोग निदान शिबिर व मोफत शस्त्रक्रिया शिबिर पार पडले. 5 एप्रिल रोजी सर्व रोग निदान शिबिर संपन्न झाले. या आरोग्य शिबिराचा गौंडरे व परिसरातील लोकांनी घेतला.

भारुड सादर करताना कलाकार

या सप्ताहात लेकीच झाड , सुनेच झाड , वृक्षारोपण आदी सामाजिक उपक्रम घेतले गेले. आलेल्या सर्वच किर्तनकार , कलाकार , कथाकार ,प्रवचन कार , भारूड कार व मान्यवरांना नारळ, हार-तुरे, शाल अशा गोष्टी न देता विविध फुलाफळांची वृक्ष देऊन त्यांचा आयोजकडून सन्मान केला गेला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!