तालुकास्तरीय सांप्रदायिक व शास्त्रीय संगीत भजन स्पर्धेत वेदांत प्रदीप ढेरे प्रथम

करमाळा / संदेश प्रतिनधी
करमाळा : भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांचे वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय सांप्रदायिक व शास्त्रीय संगीत भजन स्पर्धेतील वैयक्तीक भजन स्पर्धेत बालगटात वेदांत प्रदीप ढेरे याचा प्रथम क्रमांक आला आहे.
या स्पर्धा २२ व २३ ऑक्टोबरला शहरातील दत्तमंदिरात घेण्यात आल्या. बालगटात आर्यन आडसुळ व ऋतुजा रविंद्र शिंदे यांना द्वित्तीय, वैष्णवी गणेश शिंदे हिस तृतीय क्रमांक व ऋषीकेश केदार ढेरे व श्रेया अमोल कुंभार यांना उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आला आहे.
भजन खुल्या गटात महादेव अंबारे व विकास रिटे यांचा प्रथम क्रमांक आला असून हरिभाऊ शेळके, भारत जाधव यांचे अनुक्रमे द्वित्तीय व तृतीय क्रमांक आले आहेत. उत्तेजनार्थ संदिप दिगंबर शिंदे व भिमराव महाराज शिंदे यांना देण्यात आले आहेत. शालेय गटात निखिल विजय वाघमारे प्रथम तर मेघराज शांतीलाल शिंदे व लिड स्कुल करमाळा यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.

शास्त्रीय संगीत लहान गटात कार्तिक अंकुश सुरवसे प्रथम तर पियुष राजु भोंग यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. मध्यम गटात अमृता विलास भाजीभाकरे प्रथम तर स्वरा सचिन कारंजकर उत्तेजनार्थ, शास्त्रीय संगीत खुल्या गटात सोमनाथ भोले प्रथम तर सौ.संगीता चिंचकर व कविता मेहेर उत्तेजनार्थ लोकसंगीत गटात हनुमंत माणिकराव काळे प्रथम तर वत्सलाबाई हराळे यांना उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला आहे. सांघिक भजन स्पर्धा. सद्गुरु भजनी मंडळ निमगाव (ह) प्रथम क्रमांक, हनुमान भजनी मंडळ द्वितीय, दहीगाव भजनी मंडळ तृतीय क्रमांक आला आहे. उत्तेजनार्थ आळजापूर भजनी मंडळ व विठ्ठल प्रासादिक भजनी मंडळ मांजरगाव यांना जाहीर झाले आहे.

या स्पर्धेत एकूण ९६ स्पर्धक सहभागी झाले होते. श्रीराम भजनी मंडळ झरे यांचे विशेष सादरीकरण करण्यात आले. यावेळी संघ प्रमुख ह.भ.प.बापूराव बागल यांचा संयोजकाच्या वतीने सत्कार करण्यात आला. स्पर्धेतील बक्षीस वितरण गणेश चिवटे यांच्या वाढदिवसादिवशी ३० ऑक्टोबरला दुपारी दोन वाजता भाजपा कार्यालयात होणार आहे; अशी माहिती संयोजन समितीचे नाना महाराज पठाडे, प्रदीप ढेरे व विजयकुमार खंडागळे यांनी दिली.
