सरपडोह शाळेत नवीन शिक्षकांचे ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीकडून स्वागत

करमाळा : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सरपडोह येथे बदलीने हजर झालेल्या शिक्षकांचा शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांच्या वतीने स्वागत सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमात शिक्षक शिवाजी लोकरे, वनिता बडे आणि वंदना कुलकर्णी यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अशोक गवारे, माजी अध्यक्ष शरद घोगरे, सदस्य मनोहर रंदवे, ग्रामपंचायत सदस्य चौगुले, गावचे पोलीस पाटील खरात तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

शाळेचे मुख्याध्यापक अडसूळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विषय शिक्षक दादासाहेब माळी यांनी सूत्रसंचालन केले तर अनुपमा वणवे यांनी आभार मानले.
नवीन दाखल झालेल्या शिक्षकांनी सत्काराबद्दल शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समितीचे सदस्य, पालक व ग्रामस्थांनी सहकार्य केले.




 
                       
                      