‘बारामती ॲग्रो’ कारखान्याला ऊस देवून सहकार्य करावे : उपाध्यक्ष सुभाष गुळवे

कंदर / प्रतिनिधी : संदीप कांबळे..
कंदर (ता.२५) : कंदर (ता.करमाळा) येथे आज (ता.२५) बारामती ॲग्रो साखर कारखान्याचे ऊस पुरवठा गट कार्यालयाचे उद्घाटन आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक नवनाथ भांगे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक धुळा भाऊ कोकरे सुहास रोकडे रोहिदास सातव संतोष देशमुख अण्णासाहेब पवार राजेंद्र धांडे नागनाथ लकडे जोतिराम भोसले शिवाजी सरडे मयुर रोकडे महेश टेकाळे सोमनाथ रोकडे अशोक तकीक वैभव तळे विजयसिंह नवले समाधान देशमुख अभिजीत भांगे युवराज जाधव शिवाजी डोंगरे शिवाजी राखुंडे कारखान्याचे मुख्य शेतकी अधिकारी बनगर एच.एम. ऊस विकास अधिकारी भापकर पी.एस .डेप्युटी शेती अधिकारी कवडे डि.एस. डेप्युटी शेती अधिकारी चाकणे एस. टी.ऊस पुरवठा अधिकारी गुळवे एच.ए. ऊस पुरवठा अधिकारी टेळे के.बी.सुपरवायझर पाबळे बी.पी.आदी उपस्थित होते.

याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आण्णा पवार यांनी केले. यावेळी बोलताना कारखान्याचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे म्हणाले की, बारामती ॲग्रो साखर कारखान्याची गाळप क्षमता वाढली असल्याने करमाळा ऊस पुरवठा गट कार्यालय सुरू करण्यात आली असून, ऊस उत्पादक शेतकरी यांनी चांगल्या दर्जेदार गुणवत्तापूर्ण असलेल्या ऊसाची लागवड करावी लागेल. कारखान्या मार्फत ऊस उत्पादक शेतकरीवर्ग यांना ठिबक सिंचन रासायनिक खते उपलब्ध करून देण्यात येत आहेत तसेच कारखान्याचे कामकाज चोखपणे असून वजन काट्यात कसलीच तक्रार नाही तरी शेतकरीवर्ग यांनी बारामती ॲग्रो साखर कारखान्यास उस नोंद द्यावी. गाळप कार्यक्रम मध्ये कसलाही वशिला लागत नसून रितसर नोंद नुसार ऊस तोड करण्यात येत आहे..यावेळी शेतकरी वाहतूक दार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल काळे यांनी केले.