ऊत्तरेश्वर मंदिरात विद्यागिरी महाराज यांची पुण्यतिथी साजरी

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – केम येथील श्री ऊत्तरेश्वर मंदिरात विद्यागिरी महराज यांची सालाबादप्रमाणे पुण्यतिथी साजरी करण्यात आली याचे संयोजक श्री ऊत्तरेश्वर देवस्थान ट्रस्ट व महंत जयंतगिरी महाराज होते. या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले होते.
सुरूवातीला सकाळी ८ ते १० या वेळेत श्री ऊत्तरेश्वर देवस्थान श्री दत्त मंदिर हनुमान नागनाथ व तसेच आनंद गिरी महराज विद्या गिरी महराज रत्नागिरी महाराज कलिंगड महाराज यांच्या समाधीस अभिषेक करण्यात आले हे अभिषेक ह,भ,प मारूती पळसकर ह,भ,प,मछींद्र गुरूजी रमेश दिक्षित यांचे वतीने अभिषेक करण्यात आले विजय कुलकर्णी यांनी मंत्रपचार केले. १० ते १२ या वेळेत ह.भ.प. ज्ञानेश्वर चंद्र सेन पाटील दहिवली यांचें कीर्तन झाले बरोबर १२ वा ,५ मी पुष्पवृष्टी करण्यात आली.
या वेळी महंत इंद्रगिरी महाराज गाणगापूर महंत सत्यनारायण गिरी महाराज मुंबई महंत नारायणगिरी महाराज महंत काशीराम भारती महंत प्रवीण भारती जेजुरी महंत विठ्ठल भारती, महंत सिद्धू महाराज मंहत संजू महाराज मंहत ईश्वर महाराज हरिदास महाराज केदारपुरी महाराज आदी साधु उपस्थित होते. तसेच श्री ऊत्तरेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त व जनता सहकारी बँकेचे चेअरमन दिलीप दादा तळेकर यांची उपस्थिती होती.या नंतर आलेल्या हजारो भाविकांना महाप्रसाद चे वाटप करण्यात आले या कार्यक्रमासाठी केम ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.


