चिखलठाण सोसायटीच्या चेअरमनपदी 'विकास गलांडे' यांची सलग पाचव्यांदा निवड.. - Saptahik Sandesh

चिखलठाण सोसायटीच्या चेअरमनपदी ‘विकास गलांडे’ यांची सलग पाचव्यांदा निवड..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : चिखलठाण (ता.करमाळा) येथील विविध विकास कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणूक दरम्यान चेअरमन पदासाठी विकास केरबा गलांडे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड सर्वानुमते करण्यात आली आहे.

ही निवड सन २०२२/२३ ते २०२७/२८ या काळातील निवडणूक बिनविरोध पार पडली असून, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था करमाळा या कार्यालयात चेअरमन पदासाठी नवनिर्वाचित संचालक मंडळाची सभा मा. निवडणूक निर्णय अधिकारी दिलीप तिजोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. याप्रसंगी राजेंद्र बारकुंड (मा.जि.प उपाध्यक्ष), केरु गव्हाणे (मा.व्हा.चेअरमन आदिनाथ सह.सा. कारखाना), बाळासाहेब रेगुडे (सचिव चिखलठाण वि.का ), सतीश बनसोडे (क्लार्क )व नवनिर्वाचित संचालक मंडळ उपस्थित होते. तसेच यावेळी चिखलठाण गावामध्ये ढोल, ताशा, तोफा यांच्या गजरात सलग पाच वेळेस चेअरमनपदी विकास गलांडे यांची निवड झाल्याने मिरवणूक काढून त्यांचे स्वागत करण्यात आले. गावात चिखलठाण गावाचे मा. उपसरपंच दिनकर सरडे यांच्या हस्ते चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला, तसेच उर्वरित संचालक मंडळाचा सन्मान राजेंद्र बारकुंड यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी गावातील रामेश्वर गलांडे शिवाजी पवार, रंगनाथ रोकडे चंद्रकांत सुरवसे, विलास सरडे, मिलिंद गोमे, संजय गव्हाणे समाधान गव्हाणे, अतुल जानभरे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!