पोथरे येथील आदिनाथ चे कर्मचारी विलासराव आढाव यांचे निधन

करमाळा/ संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.२: पोथरे येथील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे सेवानिवृत्त कर्मचारी व प्रसिध्द हाॅलीबाॅल पटु विलासराव भीमराव आढाव (वय ६०) यांचे अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी सुना,नातवंडे असा परिवार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून ते अजारी होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच आज(ता.२) सकाळी अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात त्यांचे निधन झाले.
श्री.आढाव हे प्रसिध्द हाॅलीबाॅलपटू होते. सर्वांना प्रेमाने जोडणारे, मनमिळाऊ आणि समाजाभिमुख कार्यकर्ते म्हणून परिचित होते. गावातील प्रत्येक सामाजिक उपक्रमात त्यांचा नेहमी पुढाकार असायचा. दिलदारपणा, उदार मन आणि सर्वांना मदतीसाठी तत्परता ही त्यांची ओळख होती.
गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. सर्वतोपरी उपचार करूनही त्यांचे आज निधन झाले. त्यांच्या जाण्याने पोथरे ग्रामस्थांवर शोककळा पसरली आहे.ते संग्राम आणि प्रसाद आढाव यांचे वडील होत.
त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी २.३० वाजता त्यांच्या शेतामध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
