उमरड येथे नुतन पोलीस अधिकाऱ्यांचा ग्रामस्थांमार्फत सन्मान..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : उमरड (ता.करमाळा) येथे नुतन पोलिस उपनिरीक्षक व पोलीस भरती झालेल्या अन्वर इमाम मुलाणी, कय्युम सलाल पठाण, मुनाफ हमीद सय्यद या युवकांचा सत्कार उमरड ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आला. याप्रसंगी करमाळा नगरपरिषदेचे नगरसेवक हाजी अल्ताफशेठ तांबोळी व पंचायत समितीचे सभापती अतुल पाटील यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी माजी सरपंच प्रमोद बदे, तात्यासाहेब सरडे, श्रीमान चौधरी,डी,जी,बदे, साहेबराव मारकड, बापू चोरमले, अनिल सुरवसे, माजी सरपंच संदीप मारकड, देवीदास पाखरे तात्या मारकड आदी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत सत्कार समारंभ संपन्न झाला.
याप्रसंगी अल्ताफशेठ तांबोळी यांनी आपले विचार व्यक्त केले, त्याचबरोबर माजी सभापती अतुल पाटील, प्रा.नंदकिशोर वलटे यांची भाषणे झाली, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुत्रसंचलन फोजमल पाखरे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रसुल शेख, इरफान शेख,इसाक शेख, अजित पठाण यांनी परीश्रम घेतले.



