शिवाजी वाळके यांची कृषी सहाय्यकपदी निवड – सरपडोह ग्रामस्थांनी केला सन्मान..
करमाळा / संदेश प्रतिनिधी : सरपडोह (ता.करमाळा) येथील शिवाजी पांडुरंग वाळके यांची महाराष्ट्र शासनच्यावतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत कृषी सहाय्यकपदी निवड झालेली आहे, शिवाजी वाळके हे पांडुरंग आजिनाथ वाळके व सरपंच मालन पांडुरंग वाळके यांचे चिरंजीव आहेत. गावातील युवक कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी झाल्यावर सरपडोह ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्याची परंपरा आहे, त्यामुळे सरपडोह ग्रामस्थांच्यावतीने शिवाजी वाळके यांचा सत्कार करण्यात आला.
अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन यश संपादन केल्याबद्दल समस्त ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. गावातील युवक कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी झाल्यावर सरपडोह ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्याची परंपरा आहे ,त्यातील एक भाग म्हणून शिवाजी वाळके यांचा सत्कार सरपडोह गावचे सुपुत्र पोलीस उपनिरीक्षक प्रदीप भिताडे व महाराष्ट्र पोलीस प्रदीप भंडारे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
तसेच त्यांना घडवणारे त्यांचे आई वडील यांचाही ग्रामस्थांच्या वतीने सत्कार संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी गावातील सरपंच,उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य,सोसायटीचे चेअरमन ,तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील,आजी-माजी पदाधिकारी व गावातील युवक वर्ग तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सूत्रसंचालन उपसरपंच श्री नाथराव रंदवे यांनी केले तसेच श्री गणेश घोगरे साहेब व श्री प्रदीप भिताडे साहेब यांनी मनोगत व्यक्त केले. तर सत्काराला उत्तर देताना शिवाजी वाळके यांनी सांगितले की सातत्य व मनामध्ये जिद्द असेल तर आपणास यशस्वी होऊ शकतो.उपस्थितांचे आभार उपसरपंच श्री नाथराव रंदवे यांनी मानले.