श्री देवीचामाळ ते संगोबा रस्त्याची चौकशी होणार असल्याचे बांधकाम विभागाचे लेखी पत्राद्वारे आश्वासन – विनोद महानवर
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा-बोरगाव-घारगाव रस्ता प्रजिमा ०५ कि,मी,०/०० ते ६/०० श्री देवीचामाळ ते संगोबा या रस्त्याच्या कामाची चौकशी होऊन कार्यवाही करण्यात यावी, यासाठी सामाजिक कार्यकर्ते विनोद महानवर यांनी स्वातंत्र्यदिनी सार्वजनिक बांधकाम विभाग अकलुज कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा दिला होता.
यावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या मध्ये चर्चा होऊन सदर रस्त्याची एक महिन्यात चौकशी करून संबंधितावर कार्यवाही करू असे लेखी आश्वासन दिल्यावरुन उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आल्याची माहिती विनोद महानवर यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना विनोद महानवर यांनी सांगीतले की, श्री देवीचामाळ ते संगोबा या रस्त्याची मुरुम साईट पट्टी न करता बील उचलेले आहे, याबाबत चौकशी करण्याची मागणी केली होती, अकलुज येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी लेखी आश्वासन दिल्यावरुन हे उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे असे विनोद महानवर यांनी सांगितले.