सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी देशमुख यांनी मांगीला भेट देत निवडणूक बुथची केली पाहणी

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – ४३ माढा लोकसभा मतदार संघ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती चारूशिला देशमुख यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांगी येथे भेट देवून बूथ क्र ३१ व बूथ क्र ३२ ची पाहणी करून ८० वयाचे मतदार , नवीन नोंद झालेल मतदार , मयत मतदार तसेच बूथ वरील स्थापन केलेले बॅग ग्रुपची माहिती घेवून मतदार टक्केवारी वाढवणेसाठी जण जागृती करणेबाबत सुचना केल्या. तसेच येथील कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.
बी एलओ संतोष पोतदार यांनी मतदार माहीती दिली. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष कल्पना राऊत यांचे हस्ते श्रीमती देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शाळा व्यवस्थापन अध्यक्ष उमेश बागल, सदस्य प्रकाश ननवरे, हिरामण कौले , वैशाली पवार, सुवर्णा महामुनी,आशा देमुंडे, मंडळ अधिकारी राऊत, तलाठी जवणे , ढवळे उपस्थित होते.


