नागरी सेवा दिनाच्या निमित्ताने ग्राहक पंचायतच्यावतीने विविध कार्यालयांना भेटी
करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा,ता.22:नागरी सेवा दिनाच्या निमित्ताने ग्राहक पंचायतच्या करमाळा शाखेच्यावतीने काल (ता.21) शहरातील विविध कार्यालयांना सदिच्छा भेटी देऊन माहिती घेतली आहे.
करमाळा नगर परिषदेत भेट दिली तेंव्हा कार्यालय निरीक्षक डी. डी. देशमुख, आरोग्य निरीक्षक जब्बार खान,पाणी पुरवठा विभाग प्रमुख फिरोज शेख यांचा ,अखिल भारतीय ग्राहक पंचायत करमाळा शाखे च्या वतीने गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
करमाळा तहसील कार्यालयात जाऊन प्रभारी तहसिलदार विजयकुमार जाधव यांचा शाल व गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
त्याप्रमाणे निबंधक करमाळा अरविंद कोकाटे यांचाही गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
तालुका कृषी कार्यालयातील तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे यांना ही गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले
यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायत सोलापूर जिल्हा महिला आघाडी प्रमुख सौ.माधुरी परदेशी, तालुका अध्यक्ष अॅड. श्री. शशिकांत नरुटे ,सचिव श्री.संजय हांडे, सह कोषाध्यक्ष श्री.आजिम खान, सदस्य श्री. शिवाजी वीर, पुढारी चे पत्रकार श्री.अशपाक सय्यद, महिला सदस्या सौ.ललिता वांगडे,सौ. नीलिमा पुंडे,सौ.रेखा परदेशी या उपस्थित होते.