शेटफळच्या विठ्ठल पाटील महाराजांना मिळाला संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात किर्तन सेवेचा मान... - Saptahik Sandesh

शेटफळच्या विठ्ठल पाटील महाराजांना मिळाला संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात किर्तन सेवेचा मान…

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : शेटफळ (ता.करमाळा) येथील विठ्ठल पाटील महाराज यांना संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात किर्तन सेवेचा मान मिळाला आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान होऊन पंढरीच्या दिशेने वाटचाल सुरू असून,या सोहळ्यामध्ये परंपरेनुसार दररोजच्या विविध सेवांचा मान विशिष्ट मानकरांना असतो.

यामध्ये लोणंद येथील किर्तन सेवेचा मान सोहळ्याचे मानकरी वासकर महाराजांच्या फडाला दिला जातो, यावर्षी राणा महाराज वासकर यांच्या सूचनेनुसार वास्कर फडाचे पाईक शेटफळ (ता करमाळा) येथील ह भ प विठ्ठल पाटील महाराज यांना ही कीर्तन सेवा करण्याचा मान मिळाला आहे.

विठ्ठल पाटील महाराज हे शेटफळ येथील रहिवासी असून, ते वारकरी संप्रदायाच्या प्रचार व प्रसारामध्ये त्यांचे मोठे योगदान आहे, त्यांना मानणारा मोठा वारकरी वर्ग करमाळा तालुक्यामध्ये व परिसरात असून महाराष्ट्रात व राज्याबाहेरही विविध ठिकाणी त्यांच्या किर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. संत ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यामध्ये मुख्य कीर्तन सेवा बजावण्याची संधी मिळणे हे किर्तनकारांच्या दृष्टीने मोठे मानाचे समजले जाते पाटीलमहाराज मिळालेल्या या बहुमानाबद्दल त्यांचे विविध क्षेत्रातील नागरीकांमधून अभिनंदन केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!